शिर्डी, 22 मे :  शिर्डी विमनतळावर मोठी विमान दुर्घटना टळलीये. धावपट्टीवरुन विमान खाली उतरल्याची दुर्घटना शिर्डी विमानतळावर घडलीये.  विमानातील सर्व 55 प्रवाशी सुखरूप आहे.
आज संध्याकाळी साडे चार वाजेच्या दरम्यान एअर अलाईन्स कंपनीचे विमान धावपट्टीवरून थेट मातीत जावून रूतले. शिर्डी विमानतळावर ही घटना घडली आहे. विमान जेव्हा धावपट्टीवरून खाली उतरले तेव्हा मोठा आवाज झाला आणि मातीचा मोठा धुराडा उडाला. त्यामुळे विमानातील प्रवाशी अगदी भेदरून गेले होते.  काही काळ काय झाले याचा कुणालाच अंदाज येत नव्हता.
विमानतळ प्रशासनाने या अपघातानंतर प्रवाशांना शिर्डीत विविध हाॅटेलमध्ये हलवलंय. सुदैवाने कुणालाही काही इजा झाली नाही. मात्र या अपघातामुळे शिर्डी विमानतळाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ही घटना घडण्यास पायलट, एअर ट्राफिक कंट्रोल की तांत्रिक गोष्टी कारणीभूत आहेत. याची आता चौकशी होणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वीच या विमानतळाचे उद्घाटन झाले आहे. काही दिवसांपुर्वी हैदराबादला जाणारे विमान बंद पडले होते तर विमानतळावरील एका गोडावूनला आगही लागली होती त्यानंतर आज ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours