रिपोर्टर: हर्षीता ठवकर

भंडारा : येत्या २८ मे रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी बुधवारला सायंकाळी संयुक्तरित्या केली.
यावेळी खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले, माजी आमदार मधुकर कुकडे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि पिरीपा आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय हा सर्वानुमते घेण्यात आला आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. आता ही निवडणूक नाना पटोले आणि खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी अस्तित्त्वाची राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने व्युहरचना आखली आहे.

कुकडे गुरूवारी दाखल करणार नामांकन
मधुकर कुकडे हे गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहेत. जलाराम मंगल कार्यालयातून सकाळी ११ वाजता ते मिरवणुकीद्वारे निघतील. मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनकरण्यात आले आहे.

पटले यांचे नामांकन दाखल
या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours