मुंबई: आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांनी त्यांच्या राहत्या घरीच डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते.
भय्यूजी महाराज यांचं पूर्ण नाव उदय सिंह देशमुख आहे. आध्यात्मिक गुरू म्हणून त्यांचं नावलौकीक आहे. पण एक आध्यात्मिक गुरु होण्याआधी, वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी काही काळ मॉडलिंग केलं पण नंतर त्यांची पावलं आध्यात्माच्या मार्गी वळली. भय्यूजी महाराज यांचे अनेक मोठे राजकीय संबंध होते.
भय्यूजी महाराज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये ओळखले जायचे, परंतु राष्ट्रीय स्तरावर ते डिसेंबर 2011मध्ये नावारुपाला आले. जेव्हा अण्णा हजारे आणि सरकार यांच्यातील संवादांची भूमिका त्यांनी बजावली आणि अण्णा हजारे यांचे उपोषण संपुष्टात आणलं. तेव्हा महाराष्ट्र नेते आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या अधिपत्याखाली भय्यूजी महाराज मध्यस्ती करत होते.
भय्यूजी महाराज राजकारणात कसे आले?
- मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या भय्यूजी महाराज यांचं मूळ गाव महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातलं होतं. त्यामुळे त्यांचे गावी येणं-जाणं होतं.
- काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यामुळे त्यांचा राजकीय नेत्यांशी संबंध वाढला.
- 1995मध्ये महाराष्ट्राचे नेते अनिल देशमुख यांच्यामाध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संपर्कात आले. मराठा असल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा एक वेगळाच प्रभाव होता.
विलासराव देशमुख यांच्याशी भय्यूजी महाराज यांची जवळीक
- असं म्हटलं जातं की, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जवळीकीमुळे भय्यूजी महाराज यांच्या राजकारणाला महाराष्ट्रात वेग आला.
- 2000साली जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हा भय्यूजी यांचा महाराष्ट्रातला प्रवास वाढला. त्यावेळेस त्यांना महाराष्ट्रात राज्य अतिथीचा दर्जा देण्यात आला होता.
- काँग्रेस नेते तर भय्यूयी महाराज यांच्यावर प्रभावीत होतेच पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा नेत्यांनीही त्यांना आदर दिला. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासोबतही त्यांचे चांगले संबंध होते.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक
- सन 2008 पासून, भय्यूजी महाराज यांचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध वाढले. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही नियमितपणे आपल्या घरी मातोश्रीवर भय्यूजी यांना भेटायचे.
बाळासाहेबांच्या निधनावेळीही भय्यूजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी ते संपूर्ण वेळ ठाकरे परिवारासोबत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी घनिष्ठ संबंध
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचे घनिष्ठ संबंध होते. जवळजवळ सगळ्याच राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.
नरेंद्र मोदी आणि भय्यूजी महाराज यांचे मोठे संबंध
पंतप्रधान होण्यापूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी उपोषणाला बसले होते. त्यावेळी उपोषण सोडण्यासाठी मोदींनी देशातल्या अनेक संत, महात्मा आणि धर्मगुरूंना आमंत्रित केलं होतं. त्यात भय्यूजी महाराज यांचंही नाव होत.
भय्यूजी महाराज यांच्या दारी राजकारण्यांची रिघ असायची
- संकटमोचक म्हणूव भय्यूजी महाराज यांची ओळख होती. 2011ला अण्णा हजारे यांचं आंदोलन संपण्यासाठी भय्यूजी यांची मोठी मध्यस्ती होती.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील भय्यूजींच्या भक्तांमधले एक होते. तथापि, काही वर्षांपूर्वीच राज ठाकरे यांच्याशी त्यांची ओळख झाली होती.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours