बीड: लातूर उस्मानाबाद बीड विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ कमी असताना ग्रामविकास पंकजा मुंडेंनी  मास्टर स्ट्रोक मारत सुरेश धस यांचा विजय खेचून आणलाय. या प्रतिष्ठेच्या लढाईत  धनंजय मुंडे यांना चित करत ही लढाई जिंकलीय. या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो असं धनंजय मुंडे यांनी सांगत, कुठे चूक झाली हे पाहू असं म्हटलंय.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना पराभव पत्करावा लागला असून संख्या बळ कमी असताना ही निवडणूक भाजपचे सुरेश धस 78 अधिकची मतं घेऊन विजयी झालेत
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत झाली. राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला होता.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours