औरंगाबाद, 12 जून : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकाल आज लागणार आहे. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेश खंडपीठाने दिलेत.
कोणत्या प्रमुख उमेदवारांमध्ये ही प्रतिष्टेची लढाई होतीय बघुयात...
1)सुरेश धस(भाजप)
2) अशोक जगदाळे( एनसीपी पुरस्कृत )
महत्त्वाचे मुद्दे
- मुंडे विरुद्ध मुंडे अशी प्रतिष्ठेची लढाई
- रमेश कराडांच्या माघारीनं राष्ट्रवादीवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की
- राष्ट्रवादीच्या बंडखोर 6 सदस्यांना मिळाला मतदानाचा अधिकार
- काकू-नाना आघाडीच्या 9 नगरसेवकांसह इतर दोन अपात्र नगरसेवकांना दणका
- बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपला साथ
- शिवसेनेनं कुठलीही भूमिका न घेतल्याचा भाजपला फटका
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours