नवी दिल्ली: दुधाच्या प्रश्नावर येत्या दोन दिवसांमध्ये तोडगा काढू असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिलीय.  केंद्राच्या या निर्णयामुळं दूध आंदोलनाची हवा निघाली असल्याचं पाशा पटेलांनी सांगितलंय. तर  नितीन गडकरी यांनी दूध आंदोलकांना धीर धरण्याचा सल्ला दिलाय. आंदोलकांनी मागणी केल्याप्रमाणं 5 रूपये देण्याची तयारी केंद्राने दाखवली आहे. तीन रूपये तातडीनं आणि नंतर टपप्याटप्प्याने दोन रूपये दूध महासंघामार्फेत देण्यात येतील असं पाशा पटेल यांनी सांगितलं मात्र ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलकांचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours