नांदेड: तीन वर्षांच्या मुलाला पुलावर सोडुन महिलेने नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी गोदावरी नदीच्या नावघाट पुलावर घडली. 30 वर्षीय मीनाक्षी गोटमुखले असं या महिलेचं नाव आहे.  मीनाक्षी गोटमुखले या महिलेने उडी घेतली तेव्हा याच ठिकाणी उपस्तिथ असलेले गोदावरी जीवरक्षक दलाचे सदस्यांनी तातडीने नदीत गेले.
पाण्यात बुडत असलेल्या या महिलेला जीव रक्षकानी बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यापूर्वी काही युवकांनी पुलावरील मुलाला बाजूला नेले. या महिलेला जीव रक्षकानी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. महिला आणि तिचा 3 वर्षाचा मुलगा दोघेही सुखरूप आहेत. मीनाक्षी गोटमुखले ही महिला दूध डेअरी परीसरातील रहिवाशी आहे. पती आणि सासरच्या जाचाला कंटाळुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं तिनं सांगितलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours