उल्हासगर: एका ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उल्हासनगर शहरात घडला आहे. हर्ष आल्हाट असं या दुर्दैवी चिमुरड्याने नाव असून त्याची हत्या नेमकी कोणी की आणि का केली याचा उलघडा करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.या हत्येने मात्र उल्हासनगर शहर हादरले आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या या ११ वर्षीय निरागस हर्षची गळा चिरून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आलीये. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ५ गणेशनगर परिसरात रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर परिसरात कपड्याच्या कारखान्यात हर्षची आई काम करत असतांना सोबत असलेला हर्ष लघुशंका करण्यासाठी बाहेर गेला. मात्र तो पुन्हा परतला नसल्याने त्याची शोधाशोध करण्यात आली. त्याच वेळ हर्षची शेजारीच असलेल्या एका रूममध्ये हत्या झाल्याची माहिती कुटुंबाला मिळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

या हत्येप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही हत्या कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली याचा पोलीस तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी विविध आठ पथके तयार करण्यात आली असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हसतमुख असलेल्या हर्षची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र त्याची हत्या कोणी केली आणि हत्येमागचा उद्देश काय होता हे शोधणे पोलिसाना मोठे आव्हान असणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours