लातूर, ता. 30 जुलै :आरक्षणासाठी राज्यभर सुरू झालेलं आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा संघटनांनी दिलाय. लातुरात आज राज्यस्तरीय मराठा समाजाची बैठक पार पडली. यापुढे आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल असा निर्णय लातुरच्या बैठकीत घेण्यात आला. तसंच 9 ऑगस्टपासून मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील मराठा आंदोलकांनी दिलाय. यापुढे सरकारशी कसलीच चर्चा करणार नाही हे देखील लातुरच्या बैठकीनंतर समन्वयकांकडून स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळं मराठा आरक्षणाचं आंदोलन सरकारला जड जाण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातल्या आंदोलनात सक्रीय असलेल्या विविध संघटनांनी सहभाग घेतला होता.

महिनाभरात मागासवर्गिय आयोगाचा अहवाल
आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, नारायण राणे यांच्या उपस्थित मराठा आंदोलकांमध्ये बोलावलेली बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्या संघटना चर्चा करायला तयार झाल्या त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असून, अजून कोणी संघटना चर्चेसाठी येणार असेल तर आमची त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी आहे. तसेच सरकारने मागास आयोगास लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली असून, अहवाल आला की एका महिन्यात अधिवेश केले जाईल. त्यामुळे सकल मराठा समाजाने राज्यात शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours