नागपूर, ता.12 जुलै : सभागृहात एखाद्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी विरोधी पक्ष अनेक संसदीय हत्यारांचा वापर करत असतात. विरोधीपक्षांनी राजदंड पळवण्याचे प्रकारही सभागृहात अनेकदा घडले आहेत. पण सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्याच आमदाराने राजदंड पळवण्याची दुर्मिळ घटना बुधवारी विधानसभेत घडली आणि हा राजदंड कुणी पळवला याचं श्रेय घेण्यासाठी चढाओढही लागली. नाणार प्रकल्पावरून लक्षवेधी सुरू असताना नाणारवरून शिवसेना आक्रमक झाली. हा प्रकल्प कोकणात नकोच, नाणार रद्द करा अशी मागणी शिवसेनेनं केली. यावरू प्रचंड गोंधळ झाला, शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि त्यांनी राजदंड पळवून हौद्यात आणला. या मुद्यावरून श्रेय शिवसेना घेईल हे लक्षात येताच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही या गोंधळात एंट्री केली आणि राजदंड पळवण्याला हातभार लावला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours