नागपूर, ता. 12 जुलै : संभाजी भिडेंना अटक होईपर्यंत विधानपरिषद चालू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतलाय. भिडे गुरुजींकडून सातत्याने होणारी वादग्रस्त वक्तव्ये आणि त्याच मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारविरोधात तोफ डागत बुधवारी सभागृह दणाणून सोडलं. तुकोबां आणि ज्ञानोबा माऊलीच्या पालखीच्या दर्शनासाठी पुण्यात दाखल झाल्यानंतर भिडे गुरुजींनी मनुबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मनुने गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवले. मनु हा संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.
या वादग्रस्त मुद्यावर विरोधकांनी आता आक्रमक भूमीका घेतली आहे. बुधवारी विधानपरिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि दोनवेळा सभागृह तहकुब करण्यास भाग पाडले. आणि त्यानंतर लगेच शिवसिनेच्या सर्व आमदारांनी नाणारच्या मुद्यावरुन विधानपरिषदेत गोंधळ घातला आणि स्टंटबाजी करत नितेश राणे आणि सेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड पळविला. एकंदर बुधवारी घडलेल्यी या सर्व घडामोडींमुळे विधानसभा अध्यक्षांना दिवसभरासाठी सभा तहकुब करावी लागली.
Post A Comment:
0 comments so far,add yours