मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत सहभागी असला तरी सेनेचे भाजपसोबतचे संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत. भाजपने टाळीसाठी कितीही हात पुढे केला तरी कुठल्याही परिस्थितीत भाजपशी हातमिळवणी करायची नाही आणि आणि भाजपला सत्ताही मिळू द्यायची नाही असे डावपेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आखल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांनी दिली आहे. या आधीच भाजपने शतप्रतिशतचा तर शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे त्यामुळे दोनही पक्ष आपल्या विस्ताराचा जोमानं प्रयत्न करत आहेत. शिवसेनेच्या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून चर्चा करत आहे. या सर्व आमदारांना स्वबळावर तयारी करण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी दिला आहे अशीही माहिती आहे. एकवेळ शिवसेना स्वबळावर सत्तेत आली नाही तरी चालेल पण कुठल्याही परिस्थितीत भाजप सत्तेत नको अशी शिवसेनेची आर पार ची भूमिका आहे. राज्यातल्या एकूण 288 मतदारसंघापैकी मोजक्या 120 जागांवर शिवसेना आपली सर्व शक्ती पणाला लावणार असून त्यातल्या 70 ते 75 जागा हमखास निवडून आणण्याचं उद्दीष्ट शिवसेनेने ठेवलं आहे.

भाजप आणि शिवसेनेची गेल्या तीन दशकांपासून युती आहे. 2014 पर्यंत राज्यात शिवसेनेला मोठा भाऊ म्हणून मान होता. मात्र 2014 नंतर परिस्थिती बदलली आणि भाजप हा मोठा भाऊ झाला. याची सल शिवसेनेला आहे. त्यातच शिवसेनेचा पारंपरिक गड असलेल्या मुंबई आणि ठाण्यातही भाजपनं आघाडी घेतली. या विभागातल्या 36 मधून 15 विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपने बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेला घाम फुटलाय. मुंबई महापालिकेतही भाजपने मुसंडी मारलीय. मुंबई महापालिकेत शिवसेनेचे 84 तर भाजपचे 82 नगरसेवक जिंकून आले. त्यामुळे भविष्यातला धोका ओळखून शिवसेनेने भाजप नकोच अशी भूमिका घेतली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours