मुंबई : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणाऱ्या शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेनं चांगलीच तंबी दिलीये. मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करू नका असा निरोपच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिलाय. शिंदे यांनी फोन करून हर्षवर्धन जाधव यांना चांगलाच समज दिला.
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. नुसता राजीनामा दिला नाहीतर त्यांनी सोमवारी विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलनही केलं. एवढंच नाहीतर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेवर आणि गृराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावरही टीका केली. त्यांच्या  टीकेची पक्षांन गंभीर दखल घेतलीय. गेले दोन दिवस मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांना एकनाथ शिंदे यांनी ताकीद दिलीये. मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करू नका असा निरोप एकनाथ शिंदे यांनी हर्षवर्धन जाधव यांना दिलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours