लंडन, 12 ऑगस्ट : देशाला 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला विजय मल्ल्याचं लंडनमधील घरात सोन्याचं टॉयलेट असल्याची माहिती समोर आली आहे. प्राध्यापक जेम्स क्रॅबी नावाच्या लेखकानं हा दावा केलाय. मात्र असं असलं तरी मल्ल्याला भारतात आणल्यावर मात्र आर्थर रोडवरील तुरुंगातच ठेवण्यात येईल अशी माहिती सरकारनं दिली आहे. विशेष म्हणजे आर्थर रोडमधील बराक क्रमांक 12 मध्ये मल्ल्याला ठेवण्यात येणार असून याच बराकमधील 12 ब या कोठडीत 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी आल्यावर मल्ल्यालाही आश्चर्याचा धक्का बसेल हे मात्र नक्की.
भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या भारतवापसीसाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारने लंडनमधील न्यायालयात विजय मल्ल्याच्या सुरक्षेसंदर्भात अहवाल दिला असून यानुसार भारतात आणल्यावर विजय मल्ल्याला आर्थर रोडमधील तुरुंगात ठेवण्यात येईल अशी माहिती सरकारने दिली आहे.
ब्रिटनमध्ये पळालेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारने ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा केला आहे. लंडनमधील न्यायालयातही यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. लंडनमधील न्यायालयात केंद्र सरकारने अहवाल सादर केल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. या अहवालात सरकारने विजय मल्ल्याच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती दिली.
विजय मल्ल्याला भारतात आणल्यावर आर्थर रोड तुरुंगात ठेवणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. आर्थर रोडमधील सुरक्षे व्यवस्थेविषयी सविस्तर उल्लेखही यात करण्यात आला आहे. आर्थर रोड कारागृहात विजय मल्ल्याच्या सुरक्षेसाठी व्यवस्था असेल असे सरकारने अहवालात स्पष्ट केले.
तुरुंग प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील अहवाल तयार करून केंद्र सरकारला पाठवला होता. केंद्र सरकारने सीबीआयमार्फत लंडनमधील न्यायालयात अहवाल सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. या अहवालामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला गती येईल अशी आशा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours