बारामती : टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळलेल्या झारगडवाडीतल्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थीनीने गोचिड मारण्याचं औषध प्राशन करुन आत्महत्या केली. आकांक्षा प्रदीप दरेकर (वय १६)असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आकांक्षा हिने 11 ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केलं. तेव्हापासुन खासगी रुग्णालयात तिची मृत्युशी झुंज सुरु होती. अखेर बुधवारी सकाळी बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
आकांक्षा ही येथील झारगडवाडीतील कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी मध्ये शिकत होती. कॉजेमध्ये जाताना झारगडवाडीत राहणारा महेश मासाळ हा युवक आकांक्षाचा पाठलाग करायचा आणि तिची छेड काढायचा. याबाबत तिने कुटुंबियांना सांगितले देखील होते. पण, 11 ऑगस्ट रोजी टोकाची भूमीका घेत आकांक्षाने घरी जनावरांसाठी आणून ठेवलेले गोचिड मारण्याचे औषध प्रशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी तीला खासगी रुग्णालायात दाखल केले. मात्र, बुधवारी उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला. आकांक्षाचा चुलत भाऊ सुरज दरेकर याने दिलेल्या फिर्यादीरून बारामती ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सुत्रांनी सांगितले.
Post A Comment:
0 comments so far,add yours