मुंबई, 23 आॅगस्ट :  छोट्या पडद्यावर ती अवतरली, घराघरात पोचली. आणि मग रसिक प्रेक्षकांच्या मनामनात पोचली. आताही तिच्या ओघवत्या वाणीनं प्रेक्षकांना नवे सूर अनुभवता येतायत. बरोबर, आम्ही स्पृहा जोशीबद्दल बोलतोय. सध्या स्पृहा कलर्स मराठीवरच्या सूर नवा,ध्यास नवा या रिअॅलिटी शोचं अँकरिंग करतेय. स्पृहा या शोबद्दल कमालीची उत्साही वाटली. ' मी छोट्या पडद्यावर काम केलं असलं तरीही रिअॅलिटी शोचं अँकरिंग पहिल्यांदाच करतेय. बोलताना स्पृहा म्हणाली. ' मी अनेक स्टेज शोजची अँकरिंग्ज केलीयत. पण छोट्यांच्या शोसाठी करणं हे वेगळं आव्हान असतं. ' स्पृहा सांगते.
सिटी आॅडिशन्सपासून मेगा आॅडिशन्सपर्यंत स्पृहा या बच्चेकंपनीसोबत होती. स्पृहा म्हणाली, ' आता सगळ्यांशी चांगली मैत्री झालीय. मुलांना हँडल करणं एक आव्हानच आहे. कारण त्यांच्या प्रतिक्रिया पूर्ण अनपेक्षित असतात. मजेशीर असतात. आपल्याला पूर्ण तयारी करून जावं लागतं.' या स्पर्धकांची निरागसता स्पृहा वेळोवेळी अनुभवत असते. तिनं एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, नेहा म्हणून एक छोटी आहे. तिनं मला विचारलं तुला काय आवडतं? मी तिला भेंडीची भाजी सांगितलं. तशी ती दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी भेंडीची भाजी आणि भाकरी घेऊन आली.'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours