नवी मुंबई :  सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन पेटले. मराठा आंदोलनात ७५०० मराठी मुलांवर ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहे. एका बाजूनं पेटवायचं दुसऱ्या बाजूनं गुन्हे टाकून त्यांचे आयुष्य बरबाद करायचं आता अशा मुलांना नोकऱ्या मिळू शकत नाही. मराठा आंदोलनात बाहेरची मुलं येऊन इथं हिंसा करतायत. ज्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही ते हिंसा करतायत असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसंच भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे नरेंद्र मोदी यांनी बसवलेला माणूस आहे अशी टीकाही त्यांनी केली.
नवी मुंबई मनसेच्या कामगार संघटनेचा मेळावा पार पडलाय या मेळाव्यात राज ठाकरे यांची चौफेर तोफ धडाडली. कर्मचारी तुम्ही कार्यालयात असतात आणि बाहेर सर्वसामान्य नागरिक असतात, ती जबाबदारी तुम्ही कार्यालयात पार पाडली पाहिजे. नाहीतर सगळं विकलं गेलंच आहे. इतर अनेक संघटना आहेत त्या करतायत ते मला माहिती नाही
मनपाचे अनेक भूखंड आत्तापर्यंत अनेक बिल्डरांना विकले गेलेत त्यावेळेस तुम्ही काय केलं ? जिकडे मनपा आहेत तिथं सगळी हाताबाहेर प्रकरणं गेली आहेत अशी टीका राज ठाकरेंनी केली.
जर कमी जागेत गणपती बसल्याचे असतील तर कपाटात बसवतो.मग हवाय कशाला सार्वजनिक गणेशोत्सव ज्याप्रकारे हिंदू सणांवर गदा आणली जात मग सगळ्या धर्मांना लागू झालं पाहिजे. मग रस्त्यावरचे नमाज बंद झाले पाहिजेत मशिदीवरचे भोंगे बंद झाले पाहिजेत अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.
नोटबंदीनंतर साडेतीन कोटी नोकऱ्या गेल्यात. ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. मुळात कोणीही कठोर निर्णय घेत नाहीये. तुम्ही पहारेकरी व्हा, मोदींसारखे पहारेकरी होऊ नका अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.
अमित शहाच्या चेहऱ्यावरची गुर्मी पाहा, मुळात हा मोदीनं बसवलेला माणूस आहे. सहकारी बँका पाहा, अमित शहांचा बँकेत किती पैसे जमा झाले ? याची माहिती समोर आली पाहिजे अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours