-जिल्हा संपादक -शमीम आकबानी
जिल्ह्यातील बहुतांश शहरांमधे दुचाकी चालविताना ताेंडाला स्कार्फ बांधण्याची फँशन आलेली आहे .याचाच फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांकडुन घेण्यात येऊन तरुण पिढीतील मुले महीलांचे गळ्यातील मंगलसुत्र हिसकावणे,माेबाईलवर बाेलत जाणाऱ्या लाेकांकडुन माेबाईल हिसकावनणे,ए.टी.एम फाेडी अशा प्रकारच्या विवीध गुन्ह्यांमंधे आेढले जात आहेत .दुचाकी वाहन चालवितांना गुन्हेगारांच्या ताेंडाला स्कार्फ बांधलेला असल्यामुळे गुन्हेगारांची आेळख पटविणे पाेलीसांना कठीन हाेत आहे. यापुढे शहरांमधे काेणीही तरुण मुले/मुली दुचाकी वाहन चालवितांना ताेंडाला स्कार्फ बांधुन वाहन चालवित असल्याचे आढळुन आल्यास त्यांचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही करन्यात येणार आहे .तरी जिल्ह्यातील जनतेनी पाेलीसांना सहकार्य करुन पालकांनी त्यांच्या पाल्यांचा वाहन परवाना असल्यासच त्यांचे ताब्यात दुचाकी वाहन द्यावे तसेच वाहन देतांना मुलांना वाहन चालवितेवेळेस काळजी घेण्याबाबत सुचना देवुन दुचाकी वाहन चालवितांना ताेंडाला स्कार्फ बांधुन वाहन न चालविन्याबाबत समज द्यावी.अल्पवयीन मुले वाहन चालवितांना आढळुन आल्यास अल्पवयीन मुलांसाेबत त्यांचे पाल्यांवर सुद्धा माेटार वाहन कायद्याखाली कारवाई करण्यात येईल असे भंडारा जिल्हा पाेलीस अधिक्षक विनीता साहु यांनी कळविले आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours