नागपूर: अभिनेता संजय दत्तला ज्या प्रकारे 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये महात्मा गांधी दिसत होते तसाच प्रकार कुख्यात अंडरवर्ल्ड डाॅन अरुण गवळीसोबत घडला की काय अशी शंका निर्माण झालीये. कारण नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत अरुण गवळीने सर्वाधिक गूण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला. अंडरवर्ल्ड डाॅन डॅडी प्रमाणेच अनेक कुख्यात गुन्हेगार आणि जेलमधून फरार झालेले कैदीही परीक्षा उर्तीण झाले आहेत हे विशेष.
'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपटात भाईगिरी करणाऱ्या मुन्नाभाईवर गांधी विचारांचा प्रभाव पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण आता असा प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. अंडरवर्ल्ड डॉन असलेल्या अरुण गवळीवर सध्या गांधीगिरीचा प्रभाव झाल्याचे दिसतोय. मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर यांच्या माध्यमातून 80 गुणांची गांधी विचार परीक्षा घेण्यात येते. यावर्षीही या परीक्षेत 160 कैद्यांनी सहभाग घेतला. नागपूरच्या कारागृहात घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत ‘डॉन’ अरुण गवळीने चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours