दापोली, 29 आॅगस्ट : आंबेनळी घाटात भीषण बस अपघातात दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव वाचले होते. आज बस दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब आणि नातेवाईक प्रकाश सावंत यांना 'फाशी द्या फाशी द्या' अशा घोषणा देत कोकण कृषी विद्यापीठावर धडकले. आंबेनळी घाटातील हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
तसंच देसाई यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी नातेवाईकांनी केलीये.
२८ जुलैच्या सकाळी साडे १० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३0 जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारक रित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र या दुर्घेटनेतून बचावलेल्या प्रकाश सावंतावर अनेक आरोप झाले.
आज सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मृतांच्या नातेवाईकांनी दापोली कृषी विद्यापीठावर धडक मोर्चात सहभागी झाले होते. प्रकाश सावंत देसाईला बडतर्फ करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. या मागणीसाठी दापोली राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शिवसेना भांडुप आमदार अशोक पाटील, सर्वपक्षीय कार्यकर्ते, नातेवाईक कृषी विद्यापीठावर धडकले. नातेवाईकांचा आक्रोश पाहून कोकण कृषी विद्यापीठाने चौकशी सुरू असेपर्यंत प्रकाश सावंत देसाई यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची ऑर्डर कुलगुरू तपस भट्टाचार्य यांनी काढली आहे.
याआधीही या संपूर्ण घटनेची वरीष्ठ पातळींवर उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करत मृतांच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलंय. तसंच माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनीही या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केलीये.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours