मुंबई, 19 सप्टेंबर : काल रात्री मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमधून 3 प्रवासी खाली पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला आणि 2 गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सायनच्या टिळक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणामुळे सध्या रेल्वे परिसरात खळबळ उडाली आहे.

काल रात्री 10 वाजेच्या सुमारास सायन ते कुर्ला स्थानकाच्या मध्ये रेल्वे रुळावर धावत्या लोकलमधून हे 3 प्रवासी रेल्वे रुळावर पडले. हे प्रवाशी खाली पडल्यची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफ यांना मिळाली. त्यांनी तात्काळ या तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

रेल्वे रुळावर शोध घेत असताना ते तिघे जण रुळावर पडलेले दिसले. त्यांना रुळावरून ताबडतोब बाहेर काढण्यात आलं आणि घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान, या प्रवाशांमधील एकाचा मृत्यू झाला.

जखमी प्रवाशींना पुढील उपचारासाठी सायनच्या टिळक रुगणल्याय नेण्यात आलं. जास्त गर्दी असल्याने हे प्रवाशी रुळावर पडल्याची पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रवाशांची माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने त्यांची नाव अद्याप कळू शकलेली नाही.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours