नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिश्याला चांगलीच कात्री लागलीये. त्यामुळे विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. काँग्रेससह 21 पक्ष या बंदमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेस एकीकडे पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी अंतर्गत आणावे अशी मागणी करत आहे. तर दुसरीकडे सरकार इंधनदरवाढीवर बचाव करत आहे.
इंधन दरवाढीवरून राजकारण तापले असताना सोशल मीडियावर एनडीए आणि यूपीए सरकारने कशाप्रकारे इंधनाच्या किंमतीत वाढ केली याबद्दल दोन्ही बाजूने चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही आकडे असं सांगताय की, यूपीए सरकारची तुलना एनडीए सरकारबरोबर होत आहे. अशीही चर्चा आहे की एनडीए सरकारच्या काळात इंधनाच्या दरात वाढ झालीये. 16 मे 2014 रोजी दिल्लीत पेट्रोलचे दर हे प्रतिलिटल 71.41 रुपये होते ते आज 80.73 रुपये इतके झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours