मुंबई, २३ सप्टेंबर- आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. पण सुरूवातीलाच हे निदान झाल्यामुळे तिच्यावर त्वरीत उपचार सुरू करण्यात आले. ताहिराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात एक भावनिक पोस्टही लिहिली.
ताहिराने लिहिलं की, ‘माझ्या डाव्या स्तनात डक्टल कार्किनोमा इन सिटू (DCIS) झाले आहे. आता मी अँजेलिना जोलीचे अर्धे भारतीय व्हर्जन झाले आहे. या काळाने मला जगण्याची नवीन परिभाषा दिली.’ यावेळी ताहिराने तिचा रुग्णालयातील एक फोटो शेअर केला. तिने लिहिले की, हा फोटो पाहून तुम्हाला त्रास होईल. पण हेच खरंय. मी सर्व वर्गातल्या महिलांना जागरुक करू इच्छिते. मी ३५ वर्षांची आहे. तुम्हाला स्तन कर्करोगाची कोणतीही लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहू नका. उलट वेळीच उपचार करून घ्या.’
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours