जिल्हा संपादक: शमीम आकबानी
सय्यद जाफरी महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर....
नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने राज्याची अर्थव्यवस्था बिघडली म्हणाऱ्यांनी अदानी व अंबानींचे किती कर्जमाफ केले व त्यांच्या उद्योगांना किती कोटी रुपयांच्या सबसिडी दिल्या, याचा हिशेब आधी द्यावा, असे आव्हान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व किसान-शेतमजूर कॉंग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी दिले आहे.
गेल्या चार वर्षात राज्याची अर्थव्यवस्थेची घडी बिघडल्याचा निष्कर्ष केंद्रीय वित्त आयोगाने काढला आहे. यावर भाजपचे प्रवक्ता आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याची अर्थव्यवस्था बिघडण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी कारणीभूत असल्याचा युक्तीवाद केला आहे. नेमक्या किती शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली याची आकडेवारी त्यांनी द्यावी.
फडणवीस सरकारची कर्जमाफी योजना केवळ फसवी असून या योजनेअंतर्गत केवळ 10 ते 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. अजूनही राज्य सरकारने नेमकी आकडेवारी जाहीर केलेली नाही. एवढ्याशा रक्कमेने राज्याची अर्थव्यवस्था बिघडली, हा तर्क समजण्यापलिकडे असल्याचा टोला पटोले यांनी हाणला.
याउलट अडानी व अंबानी उद्योग समुहांचे करोडो रुपयांचे बुडीत कर्ज माफ केले. तसेच त्यांच्या उद्योगांना लाखो रुपयांची सबसिडी दिली आहे. याचा हिशेब भाजपने आधी जनतेला द्यावा, असे आव्हान पटोले यांनी दिले आहे.
पीक विमा कंपन्यांच गब्बर
शेतकऱ्यांना दुष्काळ स्थितीची मदत करण्यासाठी आणेवारी कायद्यात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत पटोले यांनी व्यक्त केले. आणेवारी काढण्याची पद्धत इंग्रजकालिन आहे. ही पद्धत शेतकऱ्यांच्या हिताची नाही. यामुळे पीक विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्या गब्बर होत असल्याचा आरोप पटोले यांनी किले.
Post A Comment:
0 comments so far,add yours