मुंबई, १२ सप्टेंबर-  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल सुरुच राहणार. या महामार्गावरील टोलवसुली पूर्णपणे बंद करायची नाही किंवा हलक्या वाहनांना त्यात सूट द्यायची नाही, असा अंतिम निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमित मलिक अहवाल व अन्य तपशिलाचा विचार करून घेतला आहे. पुढील १२ वर्ष तरी एक्स्प्रेस वेवरील टोल बंद होणार नसल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून प्रवास करताना टोलसाठी तुमचा खिसा रिकामा होणं अटळ आहे. कारण मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील टोलबंदी कायम राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयात स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुमित मलिक अहवालाचा दाखला देत मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलबंदी कायमची बंद करणं अशक्य असल्याचं सांगितलं. तसं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलंय.
लहान वाहनांनादेखील टोलमधून सुटका मिळणार नाहीय. दरम्यान मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरची टोलबंदी शक्य आहे की नाही या प्रश्नावर उच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेच्या निमित्तानं खलबतं झाली. मात्र प्रवाशांना दिलासा देण्यात सरकारला यश आलेलं दिसत नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours