हिंगोली:  नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिसच जर बेपत्ता होत असतील तर प्रकरण गंभीर म्हणावे लागेल. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे कालपासून बेपत्ता झाले आहे. विशेष म्हणजे एक पोलीस अधिकारी अनेक तासांपासून बेपत्ता असतानाही पोलीस मात्र तपास लावू शकले नाही.
सरस्वती चेरले हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांची पत्नी आहे. आपला पती बेपत्ता असल्यामुळे त्यांनी न्यायासाठी धाव घेतलीये. सरस्वती चेरले यांचे पती म्हणजेच पीएसआय तानाजी चेरले गेल्या अनेक तासापासून म्हणजे १० सप्टेंबर च्या दुपारी २ पासून बेपत्ता आहेत.
इतके तास उलटूनही पोलीस स्वतः त्यांच्या अधिकाऱ्यांचा शोध सुद्धा लाऊ शकले नाहीत. इतकेच काय ११ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजल्यापासून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या तानाजी चेरले यांच्या पत्नी सरस्वती यांची तक्रार घ्यायला २ वाजले.
एकीकडे पोलीस अधीक्षक कार्यालयात सरस्वती चेरले या पोलीस अधीक्षकांकडे दाद मागण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या तंट्यामुळे अशांत असलेले पोलीस ठाणे आणि सरस्वती चेरले. यांच्या रडण्याने सगळं पोलीस अधीक्षक कार्यालय अशांत झाले होते.
स्वतःचा अधिकारी बेपत्ता असताना पोलीस अधीक्षक मात्र याविषयी गंभीर होते का असा प्रश्न निर्माण होतोय. १० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलीस ठाण्यात जातो म्हणून निघून गेलेले चेरले हे अजून परतले नाही. त्यांचा मोबाईल बंद येत आहे.
काल  शोधाशोध घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याविरोधात तक्रार दिली असून वरिष्ठ अधिकरी व्यंकट केंद्रे यांच्या जाचाला कंटाळून तानाजी चेरले निघून गेले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चेरले यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल झाली आहे.
सरस्वती चेरले यांनी अखेर गृह पोलीस अधीक्षक सुजाता पाटील यांच्याकडे येऊन हकीगत मांडली. एक महिला असल्यामुळे पाटील यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. आम्ही पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांचा शोध घेत आहेत अशी प्रतिक्रिया सुजाता पाटील यांनी दिली.
योगेशकुमार हे आयपीएस आहेत ते आल्यापासून हिंगोली जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सुधारून नागरिकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होत असताना जर एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला न्याय मिळत नसेल तर इतरांचं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours