मुंबई: हैदराबादच्या निजामाच्या शाही खजिन्यावर डल्ला मारणारे चोर अखेर मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. या चोरांची खासियत म्हणजे यातील एक चोर दररोज निजामाच्या शाही डब्यातून जेवायचा...तब्बल 4 किलो सोनं, हिरे आणि माणिकजडीत असा हा डबा आहे.
हैदराबाद पोलिसांनी २ सप्टेंबरला या खळबळजनक चोरीचा छडा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी अगदी फिल्मी स्टाइलने ही चोरी केली. त्यानंतर ते फरार झाले आणि मुंबईला पोहोचले. हे दोन्ही आरोपी मुंबईत 'जीवाची मुंबई' करत होते. पकडले जाण्याच्या आधी ते एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबले होते.
२ सप्टेंबर रोजी चोरांच्या या टोळीतले दोघे व्हेंटिलेटरच्या मार्गाने प्राचीन हवेलीतल्या जुन्या खोल्यांमध्ये शिरले. त्यांनी लोखंडी ग्रील तोडून वस्तूसंग्रहालयात प्रवेश करण्यासाठी रस्ता बनवला आणि चोरी केली. पोलिसांनी परिसरातल्या ३२ सीसीटीव्हीमधलं फुटेज पिंजून काढून ही चोरी पकडली. यासाठी पोलिसांची २२ पथकं तयार करण्यात आली होती.
निजामाच्या वस्तुसंग्रहालयात ४५० वस्तू
निजामाच्या या वस्तुसंग्रहालयात ४५० विविध वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात. यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २५० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत आहे. १९६७ मध्ये निजाम मीर उस्मान अली खान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनेक वस्तू अवैध पद्धतीने देशाबाहेर गेल्या. निजामाकडे ४०० टन सोनं आणि ३५० किलो हिरे होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours