मुंबई: बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर आता गोविंदा चांगलाच नाराज झालाय. दहीहंडी समन्वय समितीने राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवावर बहिष्कार घातलाय. पुढील वर्षी गोविंदा राम कदम यांच्या दहीहंडीत थर लावणार नाही हे आता निश्चित झालंय.
अभिनेत्री प्राची देसाईसाठी सातव्या थरावरून खाली उतरवणे, मुली पळवून आणण्यासाठी फोन नंबर देणे असा पराक्रम गाजवणारे राम कदम चांगलेच अडचणीत सापडले आहे. भाजपने तर वृत्तवाहिन्यावर जाण्यास बंदी घालणार आहे. तर दुसरीकडे गोविंदांनीही आता राम कदम यांच्या दहीहंडीत थर लावण्यास नकार दिलाय. दहीहंडी समन्वय समितीने राम कदम यांच्या दहीहंडीवर बहिष्कार घातलाय.
पुढच्या वर्षी समन्वय समितीचा सदस्य गोविंदा पथक राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात जाणार नाही असं समितीने जाहीर केलंय.
दरम्यान,राम कदमांच्या या विधानामुळे भाजपची प्रतिमा डागळली गेलीये. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपने पाऊल उचलणार आहे. राम कदम यांनी प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
वादग्रस्त विधानानंतर प्रवक्ता म्हणून कोणत्याही वृत्तवाहिनीवर न जाण्याच्या राम कदम यांना पक्षाने सूचना दिलेय. पक्षाची थेट बदनामी होत असल्याने राम कदम यांचे प्रवक्तेपद काढले जाण्याची शक्यता आहे. सध्या केवळ राम कदम यांना पक्षाकडून तोंडी सूचना देण्यात आल्याचं कळतंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours