मुंबई: मुंबईत ऐन संध्याकाळी निघालेल्या चाकरणाऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसलाय. मुंबईत वादळी वाऱ्यासह तुफानी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडासह पावसाने धुमशान घातले.

ऐन संध्याकाळी चाकरमान्यांना घरी जाण्याच्या वेळीत मुंबईत ढगांनी अचानक गर्दी केली. दक्षिण मुंबईसह कुलाबा, नरिमन , मलबार, वरळी, दादर, लोअर परळ भागात पावसाने हजेरी लावली.

संध्याकाळी अचानक ढगांनी गर्दी केल्यामुळे सर्वत्र काळोख निर्माण झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांनी त्रेधातिरपट उडाली. मध्य मुंबईत तुफान वादळी वाऱ्यासह वरुणराजे बरसले. ठिकठिकाणी रिपरिप पाऊस आणि प्रचंड वारं आणि विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची अचानक सुरू झालेल्या पावसाने दैना उडाली.

तर रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. नागोठणे , पेण , उरण , रोहा परिसरात पावसाच्या सरी कोसळताय. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. काही परिसरात गारांचाही वर्षाव झाला. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडीत झालाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours