पुणे, 25 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवड शहरातील दळवी नगर परिसरात काही घरांना लागलेल्या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दळवी नगर परिसरात रात्री 3 च्या सुमारास ही आग लागली. या आगीची तीव्रता इतकी होती की त्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
सगळ्यात आधी एका पत्र्याच्या घराला लागली होती.  त्यावेळी त्या घरातील शंकर क्षिरसागर आणि  प्रदीप मोटे  या दोघांनीही बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने त्यांना घेरल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत. या दोघांनीही आरडाओरडा केला. त्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्नही केला. पण दुर्देव म्हणजे त्याच वेळी सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीने आणखी जोरात पेट घेतला.
सिलेंडरच्या या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांनीही पेट घेतल्याने नागरिकांची धावपळ झाली. आग पसरत गेल्याने इतरही पाच घरे आगीच्या भक्षस्थानी पडली. ही घरं आगीत जळून ख़ाक झाली आहेत. दरम्यान परिसरातील कार्यकर्त्यांनी इतर नागरिकांना सावध करत घरा बाहेर काढले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवत आगिवर नियंत्रण मिळवल आहे.
पण इतकी भीषण आग लागण्याचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाही. दरम्यान, या आगीत 2 सिलेंडकचे स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्य़ात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जागेचा पंचनामा करत आहे.
तर पोलिसांनी दोन मृतांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पण नेमकी ही आग कशी लागली की यात काही हत्येचा कट आहे याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.
या सगळ्या प्रकारात घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू मिळते का याचा आता पोलीस शोध घेत आहेत. तर काही धागेदोरे शोधण्यासाठी स्थानिकांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours