पुणे : पुण्यातल्या हडपसर चे भाजप आमदार आणि भाजप युवा मोर्च्यांचे राज्याचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यावर 50 लाख रुपये खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोंढवा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
योगेश टिळेकर आणि त्यांचा भाऊ चेतन टिळेकर यांनी कोंढवा परिसरात ऑप्टिक फायबरचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला वारंवार फोन करून 50 लाख रुपयांची मागणी केली. 'इ-व्हिजन टेलिइन्ट्रा प्रायव्हेट लिमिटेड' असे या कंपनीचे नाव असून, कंपनीचे दक्षिण पुणे विभागाचे अधिकारी रवींद्र बराटे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिलीये. 7 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचे बराटे यांनी तक्रारीत म्हटलंय.
यासंदर्भात महिन्यांपूर्वी तक्रार देण्यात आली होती आणि सोबत पुरावे म्हणून मोबाईल चे रेकॉर्डिंगही देण्यात आलं होतं. महिनाभराच्या तपासानंतर शुक्रवारी सकाळी योगेश टिळेकरांवर यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे सहा. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours