चंद्रपूर: चंद्रपूर शहरात एक धक्कादायक हत्या घडली आहे. शहरातील बालाजी वार्ड परिसरात राहत्या घरात आजीसह नातीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
सुशीला पिंपळकर (वय ५२)आणि श्वेता राजपूत (वय ७)अशी मृतांची नावं आहेत. बालाजी परिसरात या खळबळजनक प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा हे दोघे फरशीवर मृतावस्थेत आढळले. धारदार शस्त्राने या दोघींनी हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी घरात तपासणी केली असता घरात काही ठिकाणी आरोपींनी जाळपोळ करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्य़ास पोलिसांनी सांगितलं आहे. या दुहेरी खून प्रकरणात ओळखीची व्यक्ती सामील असल्याची दाट शक्यता असल्याने पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
यात चंद्रपुर पोलीसांनी एका तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हत्येचे कारण अद्यापही समजू शकलं नसलं तरी प्रेम प्रकरणातून ही घटना झाल्याची प्राथमिक चर्चा आहे. त्यामुळे आजी आणि नातीची अशी निर्घृण हत्या का करण्यात आली याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours