(जि.प.सदस्य पंचबुध्दे यांचे आश्वासन ठरले फाेल)
९ऑक्टाेंबर पासुन राेडगे यांचा उपाेषणाचा इशारा
 *जिल्हा संपादक शमीम आकबानी* 
भंडारा-----देव्हाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य के.के.पंचबुध्दे यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची मागणी भंडारा जिल्हा कांग्रेस कमेटीच्या अनुसुचित सेलचे महासचिव स्नेहल राेडगे यांनी केली आहे.
---देव्हाडी जि.प.क्षेत्रातुन निवडणुकीच्या दरम्यान पंचबुध्दे यांनी जनसामान्याच्या विकासकामाचे आश्वासन देवुन विजय मीळवीला हाेता.मात्र गेल्या साडे तिन वर्षाच्या कार्यकाळात क्षेत्रात  एकही विकासकामे पार पाडलेली नसुन त्यांनी जनतेची दिशाभुल केल्याचा आराेप राेडगे यांनी केला आहे.फाेल ठरलेल्या आश्वानांचा आधार घेत पंचबुध्दे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांच्या विरुद्ध उपाेषनावर बसणार असल्याची माहिती राेडगे यांनी या वेळेस दिली आहे.देव्हाडी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत एकुन ११ गावांचा समावेश आहे.त्या भागात बंद पडलेली फेराे कंपनी सुरु करण्याकरिता पंचबुध्दे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार एकही प्रयत्न केलेले नाही त्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीनी कंपनीने ग्रहण केल्या त्या परत मिळवुन देणार असल्याची खाेटी आश्वासने दिल्याचा आराेप ही राेडगे यांनी केला.सदर क्षेत्रातील ११ गावांच्या मुलभुत समस्यांचे गेल्या तीन वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य पंचबुध्दे यांनी एकही विकास कामे केली नाही त्यात देव्हाडी, माडगी,सुकळी,बाम्हणी,धारगाव,ढाेरवाडा,शिवनी,काेष्टी स्टेशनटाेली या गावामध्ये रस्ते,नाल्या,रस्ताबांधकाम व इतर सुधारणांची कामे शुन्यचं व त्यातही पुरग्रस्तांना मिळालेल्या जमिनीच्या पट्ट्यांवर घरकुलाची एकही विट रचली नसल्याची प्रखर टिका स्नेहल राेडगे यांनी केली आहे.
-------आपण ज्या क्षेत्रात निवडुण आलाे त्या क्षेत्राचा विकास हाेत नसेल तर त्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी स्नेहल राेडगे यांनी केली आहे.येत्या ९ ऑक्टाेंबर ला के.के.पंचबुध्दे यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा द्यावा अऩ्यथा आपण उपाेषणावर बसनार असल्याचे राेडगे यांनी सांगितले आहे।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours