मुंबई: मृत्यूच्या दारातून परतलेल्या पूजा भोसले हिच्यावर आता रेल्वे पोलिसांनी कारवाई केलीये. लोहमार्ग पोलिसांनी फुटबोर्डवर उभं राहुन प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय.
लोकलच्या दारात उभं राहून प्रवास करताना एक मुलगी पडली, आणि तिला अन्य प्रवाशांनी वाचवल्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला होता.या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीचा अखेर शोध लागलाय. पूजा भोसले असं या मुलीचं नाव आहे. पण ज्याने वाचवले त्यांचे तीने आभार आणले पण ज्याने माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याच्यावर पूजा चांगलीच संतापली. व्हिडिओ काढणारा जर मला भेटला तर सांगतेच असा दमच पुजाने भरलाय.
पूजा भोसले ही भायखळा परिसरात राहणारी आहे. सोमवारी ती दिवा इथं राहणाऱ्या तिच्या मित्राला भेटण्यासाठी निघाली होती. यावेळी घाटकोपर-विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यान दरवाजात उभी असताना तिचा हात सुटला आणि ती थेट खाली पडली, मात्र यावेळी तिच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रवाशांनी तिला वाचवलं. हा प्रकार एका प्रवाशाने मोबाईलमध्ये चित्रित केला आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
मात्र या सगळ्या प्रकारानंतर पश्चात्ताप करण्याऐवजी पूजा मात्र वेगळ्याच अविर्भावात माध्यमांसमोर आली. ज्याने वाचवलं तो देवमाणूस होता यात वाद नाही, पण ज्याने माझा व्हिडीओ काढून पसरवला, त्याचा पत्ता मला द्या, त्याला मी सोडणार नाही, असा पवित्रा तिनं घेतला.
जो व्हिडिओ रेकॉर्ड करत होता त्याने मला वाचवलं असतं तर त्याचं काय बिघडलं असतं ?, मी हेअरफोन्सवर गाणी ऐकत होते, नेमकं हात झटकला आणि लोकल आली, त्यामुळे माझा तोल गेला. मी खाली पडले खऱी पण माझा हात एका प्रवाशाच्या हातात आला म्हणून वाचले असा दावाही पूजाने केला.
लोकलच्या दारात का उभं राहते असं प्रश्न विचारला असता, मी कधीच महिलांच्या डब्यात जात नाही. लहानपणापासून मी पुरूष डब्यातूनच प्रवास करते असं उत्तर तीने दिलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours