मुंबई, 04 ऑक्टोबर : गेल्या महिनाभरापासून इंधन दरवाढ काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात आज 14 तर डिझेल 21 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 91 रूपये 34 पैसे प्रतिलीटरवर गेला. तर डिझेलचा दर आता 80 रूपये 10 पैशांवर गेलाय. दरम्यान दैनंदिन सुरू असलेल्या या इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर चांगलाच ताण पडतोय.
इंधन दरवाढीमुळं तुमचा-आमचा खिसा रिकामा होत असताना, आता लालपरीचा अर्थात एसटीचा प्रवास देखील महागणार आहे. लवकरच एसटीकडून 8 ते 9 टक्क्यानं भाडेवाढ केली जाणार आहे.  भाडेवाढीच्या प्रस्तावाला एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी मंजुरी दिलीय.
सध्या हा प्रस्ताव परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. डिझेलचे दर 80च्या घरात पोहोचले आहेत. अशातच कामगार वेतन करार आणि इंधन दरवाढमुळं एसटीचा तोटाही 3 हजार 660 कोटींच्या घरात पोहोचलाय. अशा परिस्थितीत भाडेवाढीशिवाय पर्याय नसल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलं आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 20 पैसे प्रतिलीटर महागलं आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 84.00 रु. प्रतिलीटर तर डिेझेलटी किंमत 75.45 रु. प्रतिलीटरवर आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे हे वाढते दर काही कमी होतील असं वाटत नसल्याचं तज्ञांकजून सांगण्यात आलं आहे. भविष्यात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता एक्सपर्टकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या महागाईमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक संकट कोसळणार यात काही शंकाच नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours