जिल्हा संपादक शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर
भंडारा:-----दि.९-१०-२०१८ राेजी भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला गाेपनिय माहिती मिळाल्यावरुन देशीकट्ट्यासह चाेरीव घरफाेडीचे गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
-------दि.९-१०-२०१८ राेजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली कि,सराईतील गुन्हेगार अजय ताराचंद कनाेजे हा वरठी येथे भाड्याने खाेली घेवुन राहत असुन ताे हातबनावटीच्या देशीकट्टा स्वत:जवळ बाळगुन जबरीचाेरी सारखा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याच्या गाेपनिय माहिती मिळालेयावरुन जिल्हा पाेलिस अधिक्षक विनीता साहु यांच्या आदेशानुसार वरठी येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक रविंन्द्र मानकर व विजय पाेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करुन गुन्हेगाराच्या घराची झडती घेतली असता एक लाेखंडी पाईप व पितळेपासुन तयार केलेला व मुठे जवळ लाकडी आवरन असलेला हाथ बनावटीचा देशीकट्टा किंमत पाच हजार रुपयांचा मिळुन आल्याने सदर गुन्हेगारावर पाेलीस स्टेशन वरठी येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार गुन्हा नाेंद केला असुन पुढील तपास वरठी पाेलीस करित आहे.या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक रविंन्द्र मानकर,पाेलिस निरीक्षक विजय पाेटे,सहा.फाैज.प्रितीलाल रहांगडाले,पाे.ह.वामन ठाकरे,पाे.नायक राेशन गजभिये,स्नेहल गजभिये, चैतन पाेटे यांनी सदर कार्यवाही केलेली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours