(नियमबाह्य पद्धतीने करित असलेला वाळुसाठा लिलाव)
जिल्हा संपादक शमीम आकबानी
गाेंदिया----माैजा घाटकुराेडाव बाेंडराणीयेथील रेती घाटातुन अवैध जप्त केलेली रेतीसाठ्याचा लिलाव नियमबाह्य पद्धतीने करण्यात येत असल्यामुळे रद्द करन्याचा निवेदन आज दि.८-१०-२०१८ ला गाेंदिया जिल्हाधिकारी यांना महिला दलित सेनेच्या वतीने देण्यात आला.
------शासन निर्णय दि.३-१-२०१८ वाळु रेती निर्गती सुधारित धाेरण शासनाने जाहिर केले आहे.शासन निर्णयामधे मुद्दा क्र.१७ मधे नमुद केल्यानुसार दक्षतासमित्या अध्यापही गठित केलेल्या नाहीत.मुद्दा क्र.१७ मधे ३ नुसार उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते दक्षता समिती स्थापणा केलेली नसुन त्यांनी अद्यापपावेताे एकही सभा घेतलेली नाही.या मधील ५ नुसार ज्या गावात वाळुसाठे असतील अश्यागावात ग्रामदक्षता समिती करण्याचे स्पष्ट आदेश आहेत परंतु अवैध वाळुसाठे असतांना सुद्धा सदर समित्या कार्यरत नाही.त्यामुळे समितीच्या साक्षरीशिवाय रेतीसाठा जप्त केले असा गृहित धरता येत नाही.या शासननिर्णयानुसार ज्या गावात वाळुसाठा दक्षता समितीने जप्त करुन शिफारस केलेली आहे असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयातुन वाळु साठ्याची लिलाव करण्याची तरतुद आहे.तहसीलदार तिराेडा यांनी आपल्या स्वत:च्या स्वाक्षरीनिशी प्रेसनाेट देवुन नियमबाह्य लिलाव राबविण्याचे प्रक्रिया करण्यात येत आहे.मुद्दा क्र.२० मधे नमुद केलेनुसार निश्चित केलेल्या हाथाच्या किमतीनुसार जप्त केलेल्या वाळुसाठेचे लिलाव उपविभागीय अधिकारी यांनी करावा अशी स्पष्ट तरतुद करण्यात आलेली आहे त्यामुळे सदर प्रक्रिया ही उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने हाेने अभिप्रेत आहे .तहसीलदार तिराेडा हे नियमबाह्य अवैध जप्त केलेला वाळुसाठे चा वाळुलिलाव करीत असल्यामुळे सदर लिलाव शासननिर्णयानुसार करण्याबाबत उपविभागीय अधिकारी तिराेडा यांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत.दि.१० ऑक्टाेंबर २०१८ राेजी तहसीलदार यांनी ठेवन्यात आलेला लिलाव रद्द करण्यात यावे या करितेचा निवेदन  महिला दलितसेना च्या जिल्हाअध्यक्ष सुनिता परदेशी यांच्या वतिने जिल्हाधिकारी गाेंदिया यांना देण्यात आला।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours