जिल्हा प्रतिनिधी शमीम आकबानी
दि. 27 आक्टोबर ला सायंकाळी सामान्य रुग्णालय भंडारा जिल्हा भंडारा येथे सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी संचालक डॉ संजीव कांबळे मुंबई यांचे सोबत डॉ संजय जयस्वाल उप संचालक नागपूर यांचे सह जिल्हा सामान्य रुग्णालय परिसराची पाहणी केली . तसेच सामान्य रुग्णालय येथील सुरू असलेल्या नवीन बांधकामाची इमारत पाहण्यात आली. नव्याने बांधण्यात आलेली मारचुरी ( P M room) ला भेट दिली. त्या नंतर रुग्णालयातील संपूर्ण वॉर्डा मध्ये प्रत्येक्ष जाऊन रुग्णासोबत भेटून माहिती घेतली व रुग्णाच्या नातेवाईकांना सुध्दा भेटून सामान्य रुग्णालयातील मिळणारल्या सर्व सुख सुविधा बद्दल विचारपूस केली. औषधीभांडार मधे जाऊन फार्मासिस्ट बवनकार यांचेशी औषधी बद्दल माहिती घेतली. सामान्य रुग्णालय भंडारा जिल्ह्यातील येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकासाठी सोय करण्यात आलेल्या धर्मशालेला भेट दिली. यावेळी संचालक डॉ संजीव कांबळे यांनी रुग्णांची गैरसोय होऊ देऊ नका त्यांना उपचार करा व वेळीच उपचार करून सुख सुविधा उपलब्ध करून घ्या. अश्या प्रकारे मार्गदर्शन केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी कारतांनी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ माधुरी थोरात, अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक (बाह्य) डॉ पियुष जक्कल, डॉ शेखर नाईक, डॉ अरुण नडगे, डॉ गोगुलवार, डॉ थोटे, डॉ जक्कल मॅडम, डॉ डोक्रीमरे मॅडम, उपस्थित होते
Post A Comment:
0 comments so far,add yours