मुंबई: आनंद आणि उत्साहाच्या भरात आततायीपणा करत सुरक्षेचे नियम कसे धाब्यावर बसवले जातात हे मीरा भाईंदर महापालिकेत दिसून आलं. इथं महिला बाल कल्याण समिती सभापती दीपिका अरोरा यांच्या कार्यालयाचं समोवारी उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनाप्रसंगी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालयातच फटाके फोडले. यावेळी साचलेल्या कचऱ्याला आगही लागली. धक्कादायक म्हणजे, इमारतीत सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यासमोरच हा फटाके फोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. भरीस भर, कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात फटाके फोडले त्यात गैर काय? अशी प्रतिक्रिया महापौर डिम्पल मेहेता यांनी दिली. या सर्प्रव कारामुळे मीरा भाईंदर महापालिकेची सुरक्षा किती कुचकामी आहे हे स्पष्ट झालंय.
सोमवारी सकाळी मीरा भाईंदर महापालीकेच्या मुख्य कार्यालयात फटाके फोडण्यात आले. आणी विशेष म्हणजे हा पराक्रम केला आहे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या अति उत्साही कार्यकर्त्यांनी. सोमवारी स्थायी समिती सभापती रवि व्यास आणी महिला बाल कल्याण समिती सभापती दीपिका आरोरा याच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी आमदार नरेंद्र मेहेता याच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क पालिकेच्या दुसर्या मजल्यावच्या वरांड्यातच हे फटाके फोडले. हे जरी कागदी फटाके असले, तरी त्यांचा आवाज कानठळ्या बवसविणारा होता. विशेष म्हणजे, या फटाक्यांमुळे साचलेल्या कचऱ्याला आग देखील लागली होती. ती जर इतरत्र पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.
सुरक्षेखातर पालीकेच्या प्रवेशद्वारावर पाच-सहा सुरक्षा रक्षक नेहमी तैनात असतात. मग इतकी सुरक्षा आणी तपासणी असताना, फटाके वर गेला कसे? हा सवाल उपस्थीत झालाय. सर्व सामान्य व्यतिला पालिकेत प्रवेश देताना अनेक प्रश्न विचारले जातात.
आयुक्तानी या प्रकाराची सखोल चौकशी करून नियमांचा भंग करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदवावेत अशी मागणी विरोधकांनी केलीय. तर फटाकेच फोडले, यात काही गैर नसल्याची प्रतिक्रीया मीरा भाईदर महानगर पालिकेच्या महापौर डिम्पल मेहेता यांनी दिलीय. उत्साहाच्या भारत त्यांनी फटके फोडले असं सांगून त्यांनी कार्यकर्त्यांची पाठराखण केलीय.
एकीकडे सर्वोच्च न्यायालय फटाके फोडण्यासाठी आवाज आणी वेळेची मर्यादा ठरवत आहे, तर दुसरीकडे चक्क शासकिय कार्यालयात भर दिवसा फटके फोडले जाताहेत. एकंदर या प्रकारामुळे पालिकेची सुरक्षा किती कुचकामी आहे हे आता स्पष्ट झालंय. भविष्यात कुणी स्फोटकं नेऊन ती फोडली त्याचे परिणाम किती घातक ठरतील याचा विचार न केलेलाच बरा अशी प्रतिक्रिया राकापा पदाधिकारी संतोष गोले यांनी न्यूज18 लोकमतला दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours