कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे. इचलकरंजी परिसरात रात्रीच्या सुमारास पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या कारवाईत अनेक जुगाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत.
जवाहर नगर आणि आभार फाटा क्लबवर देखील पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात तब्बल 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या जुगारी अड्ड्यांवरून 12 मोबाईल आणि 13 हजारांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
इंचलकरंजीमध्ये काही ठिकाणी जुगाऱ्यांचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. यानंतर मोठा सापळा रचून पोलिसांनी परिसरातल्या अड्ड्यांवर छापा टाकला आणि कारवाई केली. सापळा रचून पोलीस अड्ड्यावर पोहताच सगळ्यांचा गोंधळ उडाला आणि पळापळ सुरू झाली.
पण या छाप्यात पोलिसांनी संपूर्ण अड्ड्यांवर मोठा गस्त घातला होता. त्यामुळे या अड्ड्यांच्या चहुबाजूला पोलिसांचा घेराव होता. त्यामुळे यातून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 12 मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours