नागपूर: उपराजधानी नागपुरात महत्वाच्या पदावर सनदी अधिकारी नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. आर्थिक संकटात असलेल्या मनपाचे आयुक्त महिनाभरापासून सुट्टीवर आहे. नागपुर सुधार प्रन्यासच्या सभापती पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. तर नागपूर मेट्रो रिजन डेव्हलमेंट अथोरिटीच्या आयुक्तपदी अद्याप कुणीच नाही. अशी परिस्थीती मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातच असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसाळ्यात नागपुरातल्या रस्त्यांची अक्षरशा चाळण झालीय, तर दुसरीकडे डेंग्युने शहरात थैमान घातलंय. पण शहरातील नागरिकांच्या स्वच्छता, पाणी, रस्ते आणि आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त विरेंद्र सिहं महिनाभऱ्यापासून सुट्टीवर आहे. हीच सर्व जबाबदारी असणारी उपराजधानीतील दुसरी स्थानिक स्वराज संस्था नागपूर सुधार प्रन्यासलाही अनेक महिन्यांपासून स्वतंत्र सभापती नाही. एकंदर अशी परिस्थीती असतांना नागपुरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यावर पाच विभागांची जबाबदारी आहे.
राज्याची उपराजधानी खऱ्या अर्थाने राजधानी कऱण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आणि नितीन गडकरी केंद्रीय दळणवळण मंत्री झाल्यानंतर हजारो कोटींचे विकासाचे प्रकल्प सुरु झाले. पण विकासाच्या योजना पुर्ण करण्याची आणि ती चालविण्याची जबाबादारी असणाऱ्या खात्यांनाच अधिकारी नसल्याने सरकाराची अनास्था दिसतेय, असे महापालिकेचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी म्हणाले.
राज्यातील अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे योग्य तो विभाग नसल्याबद्दल त्यांच्यात नाराजी आहे. दर दुसरीकडे उपराजधानीतच अशा महत्वाच्या पदांवर अधिकारी नाहीत. मिनिमम गर्वमेंट मँक्सिमम गर्वनंस असा आदर्श सांगणाऱ्या भाजपच्याच काळात उपराजधानीत अधिकारी नाही. राज्यातील अधिकारी संपले की मर्जीतले अशी कुजबुजही या निमित्ताने होऊ लागली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours