मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून गेल्या आठवड्यात दारूची होम डिलिवरी ही योजना सुरू करण्यात आली होती. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर ही योजना सरकारकडून रविवारी मागे घेण्यात आली. महाराष्ट्रात ड्रिंक अॅण्ड ड्राईव्हचे प्रमाण कमी व्हावे म्हणून शासनाने या योजनेला सुरुवात केली होती.
संपूर्ण राज्य भरात या योजनेवर टीका करण्यात आली होती. आता महाराष्ट्र सरकार दारूबाबत आणखी एक निर्णय घेणार असल्याची माह्ती समोर येत आहे.  राज्य सरकार दारूवरील कर वाढवण्याच्या विचारात आहे.
वाढत्या करामुळे दारूच्या किंमतींवर फरक पडणार असून 30 रूपये प्रति लीटर कर वाढण्याची शक्यता आहे. भारतात बनवल्या जाणाऱ्या सर्व विदेशी दारूवर महाराष्ट्र सरकार कर वाढवणार आहेत.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानुसार इंडियन मेड फॉरेन लिकरवर 2013 पासून शुल्क वाढ करण्यात आली नाही. म्हणून राज्य सरकारनं आयएमएफएल वर वाढ करण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन मेड फॉरेन लिकरवर उत्पादन शुल्क वाढवण्याची गरज आहे. इंडियन मेड फॉरन लिकरमध्ये व्हिस्की, स्कॉच, रम, वोडका, ब्लिझर यांचा समावेश होतो. त्यामुळे सरकारने आयएमएफएल वर वाढ केल्यास यासर्व प्रकारातील दारू महाग होऊ शकतात.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours