जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा-----एच.पी.गँस गाेडावूनमधुन चार लक्ष ६३ हजार रुपये रक्कम असलेली बँग घेवुन जात असताना दाेन अज्ञात इसमांनी ती हिसकावुन नेली.ही  घटना शुक्रवारी दुपारी २:३० च्या सुमारास राजीव गांधी चाैक परिसरात घडली असुन संपुर्ण व्यापाऱ्यांमधे भिती चे वातावरन पसरलेले आहे.
------प्राप्त माहिती नुसार मधु नंदुरकर व त्याचा मित्र सुधाकर भाेंगाडे हे दाेघेही एच.पी.गँस गाेडावुनमधून रक्कम घेवुन शास्त्री चाैक येथील बँकेत सदर रक्कम जमा करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.सदर संपुर्ण घटना सीसीटिव्ही मधे कैद झाली असुन त्यानुसार भंडारा पाेलिसांचा तपास सुरु आहे.अज्ञात चाेरटे हे राजीव गांधी चाैकातुन शितला माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याहुन पसार झाले.सदर तपास पाेलिस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours