10 आॅक्टोबर : 90 च्या दशकातील रिमिक्ससाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध गायक नितीन बाली यांचे अपघातामुळे निधन झाले. बोरिवलीहून मालाडच्या घरी येताना नितीन बाली यांच्या कारला अपघात झाला होता. उपचारानंतर त्यांना घरी नेण्यात आलं होतं. पण प्रकृती खालावल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.
नितीन बाली हे आपल्या कारने बोरिवलीहून मालाडला घरी जात होते. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्यांची कार डिव्हायडरवर आदळली. या अपघातात नितीन बाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. डाॅक्टरांनी चेहऱ्यावरील जखमांना टाके देऊन घरी पाठवण्यात आले. पण घरी गेल्यावर त्यांची प्रकृती आणखी खालावली. रक्ताच्या उलट्या होऊन ते घरीच बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यांना रुग्णालयात नेलं असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ते ४७ वर्षांचे होते. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
नितीन बाली यांची 90 च्या दशकामध्ये अनेक प्रसिद्ध रिमिक्स गाणी हिट झाली होती. नीले नीले अंबर पर, एक अजनबी हसिना से, पल पल दिल के पास अशा गाण्यांचा त्यात समावेश होता.
नितीन बाली यांच्या पत्नी रोमा बाली या लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. २०१२ मध्ये नितीन बाली यांनी संगीत क्षेत्रातून बाहेर पडले होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours