रिपोर्टर सय्यद जाफरी 
भंडारा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी जिल्ह्यांतील कार्यरत असलेल्या ३९ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती बहाल केली. यामध्ये १३ पोलीस हवालदार,६ साहाय्यक फोजदार व २० पोलीस  नाईक या पदावर पदोन्नती देण्यात आली. २ ऑक्टोम्बर रोजी भंडारा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पदोन्नती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर स्टार तसेच पोलीस हवालदार व पोलीस नाईक यांच्या खांद्यावर पद निदर्शक फीत  चढवून पदोन्नती बहाल केली. व त्यांचे अभिनंदन केले. पोलीस दलातील हवालदार तुकाराम गभने, लक्ष्मण चोपकर, अरुण गांथाळे, धनराज जगनाडे, राजेश पोहरकर, सिद्धेशव थोटे, यांना सहाय्यक फोजदार या पदावर पदोन्नती देण्यात आली. व २० पोलीस शिपायांना नाईक पदावर पदोन्नती देण्यात आली त्यात प्रशांत तांडेकर, रसिका कांगाले, पुरुषोत्तम थेर, शिल्पा शेंडे, माधुरी रामटेके, हेमलता आकरे, लक्ष्मी थोटे, मंगेश शिवणकर, प्रमोद टेकाम, घनश्याम कोडापे, ईश्वर कडवं, अतुल रायपुरकर, प्रदीप बोरकर, इंद्रायणी येलमुले, सतीश सिंगनजुडे,रामकृष्ण बावनकुळे, किशोर हटवार, श्रीकांत मस्के, मिलिंद गभणे, यांचा समावेश आहे. पोलीस नाईक पदाचे दिनेश ठाकरे, रमेश खोब्रागडे, टीकाराम कोरे, मंगल कुथे, सुनील भोवते, तैजराम आस्वले , इर्शाद खान , केशव चचाने, संजय वाकलकर, चांद्रमानी तभाने, राजेश बांते, राजेश पांडे, कांचन टेम्भुरने, यांना हवालदार पदी पदोन्नती देण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आनंद  वैक्त केले. लवकरच इतर कर्मचाऱ्यांना सुधा पदोन्नती मिळेल अशी आशा आहे.
पदोन्नती बहाल करते वेळी भंडारा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी मार्गदर्शन कारतांनी मिळालेली जवाबदारी आपले कर्तव्य म्हणून पार पडावे व समाजाचा विकास करत पोलिस विभाग व जनासामान्यामध्ये असलेली दुरी कमी करत कायदा व सुवेवस्था कायम राहील याची काळजी  घ्यावी. असे संबोधित करत पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours