मुंबई: मुंबई क्राइम ब्रांच यूनिट 11 च्या टीमने एका टोळीतील 5 सदस्यांना अटक केलीय. कोलकाता पासून ते मुंबई पर्यंत मोठ्या मोठ्या बँकांमधून या टोळीतल्या सदस्यांनी कार लोन, होम लोन आणि बिज़नेस लोनच्या स्वरूपात कर्जाची रक्कम उचलून अनेक बँकांना कोट्यवधींचा चुना लावला.
या टोळीनं Indian Bank आणि Bank of India ला दोन कोटींचा चूना लावल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीनं आजतागायत विविध बँकांमधून 12 कोटींच्यावर कर्जाची रक्कम उचलली असल्यीची माहिती चौकशीदरम्यान समोर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या टोळीत काही बँकांचे अधिकारी आणि कर्ज वितरित करणारे एजेंटसुद्धा सामील असल्याची शक्यता मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. करण या टोळीतील सदस्य पूर्णतः बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकांमधून कोट्यवधी रुपया काढत होते. यातून त्यांनी ना घर खरेदी केले, ना कार खरेदी केली, ना कोणता व्यवसाय सुरू केला.
या टोळीतीला मुख्य आरोपी कौशिक कुमार नाथ उर्फ रोमी राजन कपूर (वय 41) मूळचा कोलकात्याचा राहणारा असून, कोलकात्यात 500 कोटींचा घोटाळा करून तो मुंबईत नाव बदलून राहत होता. याचा गोष्टीचा तपास कोलकाता सीबीआई करीत आहे. मुंबईत आल्यानंतर कौशिकने अशोक दीक्षित (34), विशाल तारकेस्वर तिवारी (41), जिग्नेश जितेंद्र रजनी (31) और विकास भास्कर डोंगरे (34) यांना सोबत घेऊन एक टीम तयार केली. ज्यांनी होम लोन, कार लोन आणि बिज़नेस लोनच्या नावावर अनेक बँकांना कोट्यवधींचा चुना लावला.
गजाआड असलेले आरोपी आधी कर्ज मागण्यासाठी बँकेत जात असत आणि बनावट कागदपत्रे जमा करून बँकेतून कर्जाची रक्कम उचलत असत. मात्र, ज्या कारणासाठी वा जी वस्तू घेण्यासाठी कर्ज घ्यायचे ती न घेता काढलेली पैसा ते आपसात वाटून घेत असल्याची माहिती पोलीसांनी दिली. मुंबईतल्या ओशिवारा या परिसरात ही टोळी वास्तव्याला होती. पोलिसांनी जेव्हा ही धडक कारवाई केली तेव्हासुद्धा ही टोळी एका मोठ्या बँकेतून कर्ज काढण्याच्या तयारित होती. पण, मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 11 च्या टीमने वेळीच सापळा रचून या टोळीला गजाआड केल्यानं त्यांचा पुढचा प्लॅन फिस्कटला.
Post A Comment:
0 comments so far,add yours