औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पैसे खात नाहीत पण ते दुसऱ्यांना पैसै खावू देतात आणि त्यातला हिस्सा घेतात असा आरोप बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. आघाडीच्या वतीने औरंगाबदमध्ये आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. एमआयएम हा पक्ष आघाडीत सामील झाल्यानंतर आघाडीच्या वतीने मंगळवारी (2 ऑक्टोबर ) औरंगाबादमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात एमआयएमचे प्रमुख खासदार असादुद्दीन ओवेसीही उपस्थित होते. राफेलच्या मुद्यावरूनही त्यांनी सरकारला फैलावर घेतलं.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले बहुजन वंचित आघाडीचा सर्वच राजकीय पक्षांनी धसका घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देवू. भाजपच्या तोड फोडीच्या राजकारणामुळे देश फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours