अमरावती: नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली. तसंच पुरुषी अत्याचाराचा उल्लेख महिलांनी नक्की करावा पण हा आरोप तेव्हाच करायचा दहा वर्षांनी नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज अमरावतीपासून त्यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली. अमरावतीत राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत पार पडलीय या मुलाखतीत त्यांनी चौफेर तोफ डागली.
ट्विटरवरून मीटू मोहिमेमुळे अनेकांवर आरोप होत आहे. महिला आपल्यावरील अत्याचाराबद्दल बोलत आहे पण यात कुणाची चेष्टा केली, ती होता कामा नये. नाना पाटेकर उद्दट वागतो हे मान्य आहे. पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांची पाठराखण केली.
तसंच सिने इंडस्ट्रीमध्ये असं काही घडत असेल तर तेव्हा लता मंगेशकर, आशा भोसले यांना त्रास झाला नसेल का ?, १५ वर्षांची असतांना मी इंडस्ट्रीट मी आले तेव्हा एका कवीने त्यांना त्रास दिला डायरेक्टरने त्याला तेव्हाच काढले असे लता मंगेशकर यांनी माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours