(८दिवसात दखल घ्या:अन्यथा रस्ता बंद चा नागरिकांकडुन ईशारा)
जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा----भंडारा नगर परिषद प्रभाग क्र.१४,व १५ च्या नागरिकांनी रस्ता दुरुस्तिचा निवेदन भंडारा नगरपरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज दिला असुन या पुर्वी दाेन्ही प्रभागातील नगरसेवकांना सुचना देवुन ही दखल दिली नसुन सदर प्रभागातील नागरिकांनी ८ दिवसात नगरपरिषदेकडुन या संदर्भात दखल घेतली नाही तर रहदारीचा रस्ता बंद करण्याचा ईशारा नागरिकांकडुन या निवेदनाद्वारे दिला आहे.
------तुमसर,माेहाडी,वरठी येथील सर्व गाड्या,बसेस,अँम्बुलंस या मार्गाने जात असल्यास रस्त्याच्या मध्यभागात काही भागाचे काम अपुर्ण राहिले असुन त्याची मागील काही दिवसापुर्वी मरम्मत करण्यात आली असुन ती काही महीन्यातंच खराब झाली असुन रस्त्याच्या दाेन्ही बाजुला लाेकांची वस्ती असुन त्यांना या रस्त्याने रहदारी करन्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.या दयनीयं अवस्थेत असलेल्या मार्गात नेहमीचं अपघात घडुन कित्येकांना दु:खापत झाली असुन अनेक लाेकांना प्राणहानी झाली आहे.या प्रभागातील दाेनही नगरसेवकांना या बाबत नागरिकांकडुन रस्ता दुरुस्तिच्या संदर्भात सुचना पण दिल्या आहेत.परंतु अजुनपर्यन्त त्यांनी   काेनताही पाऊल ऊचलेला नसल्याने येथील नागरिकांंमधे तिव्र आक्राेश पसरलेला दिसुन आल्याने या दाेनही प्रभागातील नागरिकांनी भंडारा नगर परिषद येथे रस्ता दुरुस्तिचा निवेदन दिला असुन येत्या ८ दिवसात जर या समस्याची दखल घेतली नाही तर नागरिकांकडुन रहदारी चा मार्ग बंद करण्याचा ईशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours