पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात दिवसाला एक बालकला लैंगिक अत्याचाराला समोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 90 टक्के व्यक्ती या जवळच्याच असल्याचे आढळून आलंय.
पुणे पिंपरी चिंचवड मधल्या उमलत्या वयातच बालकांना नात्यातल्या किंवा ओळखिच्या लोकांकडूनच वासनेचा शिकार केलं जातं. या मुलांवर अत्याचार करणारे कुणी अनोखळी नसून त्यात काका, मामा, शिक्षक, स्कूल बसचा चालक, शेजारी, वडिलांचा मित्र, मानलेले अजोबा, मानलेला मित्र हेच असल्याचे आढळून आले आहे.
कोथरूड परिसरात पाळणा घरात ठेवेलेल्या चिमुकलीवर पाळणा घर चालविणाऱ्या महिलेच्या मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. तर येरवड्यात क्लास घेणाऱ्या तरुणीच्या सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. काही घटनांमध्ये तर वडिलांकडून देखील अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत.
जवळच्याच व्यक्तिंकडून वासनेला बळी पडल्यांलेल्या अशा मुलांच्या मानसिक घुसमट होते. ती जास्त अस्वस्थ करणारी असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. या घटनांचा दिवसेंदिवस वाढता आकडा हा सामाजिक स्वास्थ्य ठिक नाही हे स्पष्ट होतं असही तज्ज्ञांना वाटतंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours